आत्महत्येकडे कल असलेला एक हिप्पी आणि अजब विनोदबुध्दी असलेला एक फकीर, असा प्रवास जो तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकेल….
जिथं देव आणि गुरु वास करतात, त्या तुमच्या अंतर्मनाला अर्पण केलेला, ‘फकीर’ हा श्वास रोखायला लावणारा,
आत्म्याच्या साहसी मुशाफिरीचं रेखाटन करणारा ‘अक्षर ‘ नजराणा आहे.जिवंत असण्याचा आनंद अनुभवा, सोपं पण आयुष्य बदलून टाकणारं, सर्वांबद्दल दयाभाव राखण्याचं तत्वज्ञान शिका आणि बदलाकडचं पहिलं पाऊल उचलून स्वत:ला बरं करा.
ही आहे एक चित्तवेधक कहाणी, कर्म, दैवी कृती, मृत्यूनंतरचं आयुष्य, आत्म्याचा आत्म्याशी संपर्क, प्राथनेतली शक्ती,श्रध्दा आणि क्षमा, ऊर्जा आणि बरं करणं, चांगुलपणात देवाचा शोध घेणं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सतत गुरुशी सुसंवाद साधून राहाणं , यासारखे गहन प्रश्न, ती सोप्या, समजेल, उमजेल अशा पध्दतीनं हाताळते.
‘द फकीर’ फक्त तुम्हाला कसं जगायचं एवढंच शिकवत नाही…
पण मरण कसं स्वीकारायचं तेही शिकवतं.
अभिप्राय :
‘ द फकीर’ ही कादंबरी रुद्र आणि त्याचा गुरु- एक फकीर यांच्यातील नात्याविषयी बोलतानाच, माणसाच्या आयुष्यातील गुरुचं स्थानही व्यक्त करते.