तुरुंगातील सावल्या – २००७

भारतीय तुरूंगात राहणाऱ्या आया व त्यांच्या मुलांना ज्या व्यथांचा  व वेदनेचा सामना करावा लागतो त्याची ही कहाणी आहे. लेखकाने देशभरातील असंख्य तुरुंगांना व्यक्तिश: भेट देऊन तिथे जीवन कंठणाऱ्या अनेक कैदी स्त्रिया व त्यांच्या मुलांशी संवाद साधला. तुरूंगातील कैदयांच्या मुलाखतींप्रमाने तिथे प्रत्यक्ष काम करणारे समाजसेवक,तुरुंगाधिकारी आणि वकील यांच्या मुलाखतीही रोमांचकारी आहेत. तुरुंगातील परिस्थिती,असुरक्षितता,कैदी स्त्रियांची व मुलांची धडपड ,आनंद,आशा आणि स्वप्ने याचे चित्रण या पुस्तकात आढळते. पुस्तक वाचताना एका वेगळ्या भावनिक कल्लोळाचा अनुभव वाचकाला येईल.

आपल्या हळुवार,नाजूक व क्वचित् नर्म विनोदाची झालर असलेल्या शैलीत लेखक वाचकाला या एका प्रवासाला आपल्यासोबत घेऊन जातो.

पुस्तक वाचून ठेवताना वाचकांच्या ह्रदयात कळ आणि डोळयात अश्रू उभे राहतात.

Amazon India

Amazon Global

Mehta Publishing House

Scroll to Top