भारतीय तुरूंगात राहणाऱ्या आया व त्यांच्या मुलांना ज्या व्यथांचा व वेदनेचा सामना करावा लागतो त्याची ही कहाणी आहे. लेखकाने देशभरातील असंख्य तुरुंगांना व्यक्तिश: भेट देऊन तिथे जीवन कंठणाऱ्या अनेक कैदी स्त्रिया व त्यांच्या मुलांशी संवाद साधला. तुरूंगातील कैदयांच्या मुलाखतींप्रमाने तिथे प्रत्यक्ष काम करणारे समाजसेवक,तुरुंगाधिकारी आणि वकील यांच्या मुलाखतीही रोमांचकारी आहेत. तुरुंगातील परिस्थिती,असुरक्षितता,कैदी स्त्रियांची व मुलांची धडपड ,आनंद,आशा आणि स्वप्ने याचे चित्रण या पुस्तकात आढळते. पुस्तक वाचताना एका वेगळ्या भावनिक कल्लोळाचा अनुभव वाचकाला येईल.
आपल्या हळुवार,नाजूक व क्वचित् नर्म विनोदाची झालर असलेल्या शैलीत लेखक वाचकाला या एका प्रवासाला आपल्यासोबत घेऊन जातो.
पुस्तक वाचून ठेवताना वाचकांच्या ह्रदयात कळ आणि डोळयात अश्रू उभे राहतात.